*स्काऊट राज्यस्तरीय राज्य पुरस्कार चाचणी शिबीर संपन्न*


 *स्काऊट राज्यस्तरीय राज्य पुरस्कार चाचणी शिबीर संपन्न*


प्रितम टेकाडे जिल्हा विशेष प्रतिनिधी 


महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट्स आणि गाईड्स, राज्य कार्यालय, मुंबई यांच्या वतीने नागपूर येथे सेंट व्हिन्सेंट पलोटी स्कूल, पलोटी नगर, नागपूर येथे राज्यस्तरीय राज्य पुरस्कार चाचणी शिबीर दिनांक 21 ते 24 डिसेंबर 2024 या कालावधीत राज्य चिटणीस श्री अरुण सपताळे, राज्य सह चिटणीस श्रीमती सारिका बांगडकर यांच्या मार्गर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते.

महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस् आणि गाईडस् व्दारा आयोजित या राज्यस्तरीय राज्यपुरस्कार चाचणी शिबिरात नागपूर व चंद्रपूर जिल्यातील 214 स्काऊट व 35 स्काऊट मास्टर  सहभागी झाले होते. 

              शिबीराच्या उद्‌घाटन प्रसंगी  शिबीरप्रमुख तथा अमरावती जिल्हा संघटक (स्काऊट) रमेश जाधव, शिबीर सहाय्यक म्हणून वर्धा जिल्हा संघटक (स्काऊट) नितेश झाडे, नागपूर जिल्हा संघटक, सत्यशील पाटील, चंद्रपूर जिल्हा संघटक, चंद्रकांत भगत, सुनील गणेर, स्काऊट मास्तर प्रीतम टेकाडे, अविनाश भालेराव, शेखर कोलते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्यशील पाटील  यांनी केले.

या शिबीरात स्काऊट-गाईड अभ्यासक्रमातील विविध कौशल्यावर लेखी, तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या गेल्या. 

नागपूर जिल्हा मुख्य आयुक्त तथा शिक्षणाधिकारी (प्राथ.) सिध्देश्वर काळूसे आणि जिल्हा आयुक्त (गाईड) श्रीमती रोहिणी कुंभार यांनी शिबीराच्या तयारीचा आढावा घेऊन शिबिरास शुभेच्छा दिल्या.

या शिबिरास राज्य कार्यालयाच्या सर्व अधिकारी वर्गाचे मार्गदर्शन लाभले.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी नागपूर जिल्हा संघटक (गाईड) मंजुषा जाधव, कार्यालयीन कर्मचारी मोहन चौरसिया, मारोती फटीग, अर्पित कडू, कुलदीप मंडवधरे, अरविंद नकाशे, नंदिनी ठवळे अर्जुन जाधव, रुपेश अनासाने, तसेच सेंट व्हिन्सेंट पलोटी स्कूल चे प्रिन्सिपॉल फादर आणि शाळेचे स्काऊट मास्तर प्रतीक कन्नाके व सर्व कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post