गुरुजी फाउंडेशन आयोजित व्हीपीके उद्योग समूहाचे अध्यक्ष मारोतराव कवळे गुरुजी यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न..
उमरी, धर्माबाद तालुक्यात सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
शेतकरी नेते मारोतराव कवळे गुरुजी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील जाधव, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खा. अजित गोपछेडे, खा. नितीन पाटील जाधव, खा.प्रा. रवींद्र पा.चव्हाण,आ राजेश पवार,कवळेंचे जावई उत्कर्ष जाधव पाटील, आ. प्रतापराव पाटील चिखलीकर, आ. हेमंत पाटील, आ. श्रीजया चव्हाण, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णांसह जिल्ह्यातील सर्व पक्षीय राजकीय नेते, सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, उद्योजक, बँकीग पत्रकारांनी कवळे गुरुजींचे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष अभिष्टचिंतन केले. गुरुजी फाउंडेशनच्या वतीने सामाजिक उपक्रम हाती घेत शेतकरी आत्महत्याग्रस्त
कुटुंबाला पिठाची गिरणी, शिलाई मशीन, उमरी पोलिस ठाण्यात आरो मशीन देण्यात आले. वृक्षारोपण, रुग्णालयात रुग्णांना ब्लॅकेट व फळे वाटप करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. सायंकाळी उमरी मोढा मैदानावर अनेक चाहत्यांच्या उपस्थितीत मित्रपरिवार, उद्योग समूहाचे सर्व खातेप्रमुख, सरपंच, उपसरपंच, सदस्य, सेवा सोसायटींचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, आजी, माजी पदाधिकारी यांनीही कवळे गुरुजींचे अभिष्टचिंतन केले. बुधवारी रात्री साडे आठ वाजता हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी कीर्तन सेवा दिली. तरुणांनी व्यसनापासून दर राहावे, आई वडिलांचे स्वप्न साकारावे असे आवाहन इंदोरीकर यांनी केले.

