कुंडलवाडी येथील दोन पोलिस अधिकारी लाच घेतांना अडकले. रेतीवाल्याने तक्रार केल्याची चर्चा

 


कुंडलवाडी येथील दोन पोलिस अधिकारी लाच घेतांना अडकले.


रेतीवाल्याने तक्रार केल्याची चर्चा


कुंडलवाडी प्रतिनिधी मारोती दुमटकर 

कुंडलवाडी:- येथील पोलिस ठाण्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांना १७ हजार रूपयांची लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. ही कारवाई लातूर येथील पथकाने गुरूवारी दुपारी करण्यात आली. या लाख प्रकरणात अन्य कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याचीही चर्चा होत असून या सापळ्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

नांदेड परिक्षेत्रात विशेष पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी जिल्हाच नव्हे तर परिक्षेत्रातील अवैध धंद्यांचा बिमोड करण्याचा विडा उचलला आहे. या धडक कारवाईस जिल्हा पोलिस अधीक्षक अविनाशकुमार भक्कमपणे साथ देत आहेत. परंतू झारीतील काही शुक्राचार्य या दोन अधिकाऱ्यांच्या कारवाईस गालबोट लावण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. कुंडलवाडी येथे खाकीला डाग लावण्याची घटना गुरूवारी दुपारी घडली आहे. किरकोळ कारवाईचा बडेजाव करणारे कुंडलवाडी ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भागवत नागरगोजे व पोलिस उपनिरीक्षक नारायण शिंदे यांना एका तक्रारदाराकडून १७ हजारांची लाच घेतांना पकडण्यात आल्याची माहिती आहे. सदर कारवाई लातूर येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली असून तक्रारदार रेतीवाला असल्याची चर्चा होत आहे. दरम्यान या कारवाईची प्रक्रिया सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरूच होती. यामुळे वृत्त लिहीपर्यंत अधिकृत माहिती तथा गुन्हा दाखल झाला नव्हता.

Post a Comment

Previous Post Next Post