आमदार राजेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली भरला जनता दरबार..
उमरी येथे दि.24/01/2025रोजि तहसील कार्यालयाच्या नवीन सभागृहात सकाळी बारा वाजता जनता दरबार संपन्न झाला असून.या प्रसंगी उपविभागीय अधिकारी श्रीमती स्वाती दाभाडे, तहसीलदार प्रशांत थोरात, गटविकास अधिकारी विश्वनाथ अरबडवाड, उमरी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी निलम कांबळे मॅडम, कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभाग सरपंच संघटनेचे अध्यक्ष मंजुशा पंतोजी अदि उपस्थित होते.प्रारंभि सर्व सन्माननीय मान्यवर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
मतदान दिनाच्या निमित्ताने उमरी तहसील कार्यालयाचे तहसीलदार प्रशांत थोरात यांनी सर्व उपस्थित नागरिकांना शपथ दिली.मा.आमदार राजेश पवार यांचा प्रशासनाच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला व उमरी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांनी भारतीय संविधान, आणि भारतीय संविधानाचि प्रास्ताविका भेट आमदारांना देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून उपविभागीय अधिकारी श्रीमती स्वाती दाभाडे यांनी सांगितले की,मा.मुख्यमंत्रि महोदय यांचा १००दिवसाचा ७कलमी कार्यक्रमा संदर्भात सखोल माहिती दिली.या जनता दरबारात उपस्थित नागरिकांनी आपापल्या गावातिल समस्या मांडल्या ते समस्या एकुण उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना त्या लवकरात लवकर सोडविण्याच्या दृष्टीने सुचना दिल्या.या जनता दरबार आयोजित कार्यक्रमाला त्या त्या विभागातील अधिकारी व कर्मचारी, तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे पदाधिकारी, शिंदे गटाचे सर्व सन्माननीय शिवसैनिक, व उमरी शहरातील सर्व पत्रकार तालुक्यातील अनेक गावांतून असंख्य नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांबळे सर यांनी केले तर आभार जय वनसागरेनि मानले.
