परभणी .बीड व अमित शहा वक्तव्याच्या निषेधार्थ . बहुजन जनता दलाची नागपूरच्या विधानभवनावर धडक
____________
मुख्यमंत्री व मंत्र्यासह शासकीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन. पंडितभाऊ दाभाडे
____________
पुणे दि. परभणी येथील दलित युवक सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरण आणि बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्तीची सखोल चौकशी करून या हत्यामागील मुख्य सूत्रधार याला अटक करा याच्यासह भाजपाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा लोकसभेच्या सभागृहामध्ये अपमान केला त्याचा निषेध करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शहा यांची केंद्रीय गृहमंत्री पदावरून तात्काळ हकालपट्टी करावी या मागणीसह वेगळे विदर्भ राज्य झाले पाहिजे. ॲट्रॉसिटी कायदा कडक करावा. मराठा धनगर आणि मुस्लिमांना आरक्षण देण्यात यावी. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देऊन त्यांचा सातबारा कोरा करावा. राज्यात महिला व दलित समाजावर होणारा अन्या अत्याचार तात्काळ थांबवावा. कापूस सोयाबीन कांदा याला योग्य भाव देऊन शेतकऱ्यांचे समाधान करावे या मागण्यासह सामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या अनेक समस्या बाबत नागपूर येथे हिवाळी अधिवेशन स्थळी मोर्चाद्वारे जाऊन मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यासह शासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सदर समस्या सोडवून सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी केल्याची माहिती पंडितभाऊ दाभाडे राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन जनता दल यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे
बहुजन जनता दलाच्या वतीने पंडित भाऊ दाभाडे राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन जनता दर यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथील संविधान चौक ते विधान भवन येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते सदर मोर्चा मध्ये बहुजन जनता दलाचे राज्यातील कार्यकर्ते यावेळी मंगेश कर्णिक राजेंद्र महल्ले संभाजी कदम गणेश तांबे तुकाराम उके किशोर तिवारी बाबासाहेब जाधव दिलीप बिरुटे दिपक निगडे साहेबराव मोरे छगन गावंडे फिरोज खान अब्दुल गफार खान जयकुमार साठेसहअनेक कार्यकर्ते व पदार्थ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
