आमदार राजेश पवार यांच्या हस्ते नेत्ररोग शिबिरांचे उद्घाटन संपन्न..

 


आमदार राजेश पवार यांच्या हस्ते नेत्ररोग शिबिरांचे उद्घाटन संपन्न..

उमरी प्रतिनिधी अनिल सोनकांबळे 

उमरी दि.

नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पवार यांच्या हस्ते संतरहिदास मंगल कार्यालयात मोफत नेत्ररोग तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.या शिबिरात४०ते१००वयोगटातिल महिला पुरुष यांनी आपल्या नेत्राचे तपासणी करून घेतली व बिना टाकेचे शिबिरात एकुण १००रुग्नाचि तपासणी डॉ.राघोजीवार, डॉ मारोतराव गाढे यांनी दिनांक २६ जानेवारी रोजी उमरी शहरातील संतरहिदास मंगल कार्यालयात तपासणी केली आहे.तालुक्यातील शेकडो नागरिक उपस्थित होते नांदेड जिल्ह्यातील तज्ञ डॉ.नेत्र चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण लाभार्थ्यांच्या डोळ्याचि तपासणी केली या मध्ये निवडलेल्या लाभार्थ्यांना दि.३० जानेवारी रोजी सकाळी ११वा.‍संत बाबा निदान सिंग मेमोरिअल हॉस्पिटल गुरुद्वारा लंगर साहेब नगीना घाट रोड नांदेड येथे लेन्स बसविण्यात येणार आहे तरी गरजू रुग्णांनी वेळेवर नियोजित स्थळी उपस्थित राहुन लाभ घ्यावा असे अनिल दर्डा व श्रिनिवास अनंतवार यांनी केले आहे या शिबिरात फक्त १००रुग्नाचि तपासणी करण्यात आली आहे आहे पुढील कांहीं दिवसात प्रत्येकाना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले जाते.

सदरिल कार्यक्रमाचे आयोजन श्रिनिवास अनंतवार, अनिल दर्डा यांनी केले होते या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे तालुकाध्यक्ष डॉ विक्रम देशमुख तळेगावकर, शिवसेना तालुकाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष सुभाष पेरेवार, ज्ञानेश्वर पाटील कदम शेलगावकर, शिवाजी हेमके शिवाजी शिंदे, बापुसाहेब पाटील कौडगावकर, सतिश गादेवार, राजेश जाधव, बालाजी पवार,व पत्रकार, या सह असंख्य नागरिक व लाभार्थी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post