प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या लोहा तालुकाध्यक्ष पदी पत्रकार शिवराज पवार यांची फेर निवड

 


प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या लोहा तालुकाध्यक्ष पदी पत्रकार शिवराज पवार यांची फेर निवड

लोहा,(प्रतिनिधी)

  प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या लोहा तालुकाध्यक्ष पदी वतनवाला या वृत्तपत्राचे पत्रकार शिवराज पवार यांची पाचव्यांदा फेर निवड करण्यात आली आहे.शिवराज पवार पत्रकारिता,शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असून त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ लोहा तालुकाध्यक्ष पदी २०२०-२१ पासून आजतागायत सलग चौथ्यांदा जबाबदारी पेलली.प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी टी आंबेगावे यांच्या आदेशानुसार व राज्य सल्लागार प्राचार्य डॉ वसंत बिरादार, मराठवाडा संघटक बा पु गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड यांनी आता सलग पाचव्यांदा लोहा तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याचे जाहीर केले.

         शिवराज पवार यांचे संघाच्या बळकटीकरणासाठीची भूमिका, पत्रकारांसह विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक, तळागाळातील लोकांचे हाताळत असलेले प्रश्न नेहमीचा विधायक कामातील सक्रिय सहभाग, दांडगा जनसंपर्क पाहता त्यांची पुनश्च प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या लोहा तालुकाध्यक्ष पदी निवड केली असल्याचे जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड यांनी जाहीर केले.

   सन- २००३ पासून वर्तमानपत्रात सण-उत्सव, महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी निमित्त तसेच वैचारिक लिखाण दृष्टिकोनातून विविध लेख प्रकाशित, 

सन २०१६-१७ पासून आजतागायत 

त्यांचे वृत्तपत्र क्षेत्रातील कार्य अतिशय उत्कृष्ट आहे.

      शिवराज पवार संघाच्या नियमांचे अधीन राहून, संघ बळकटीकरण व संघाची ध्येयधोरणे पूर्णत्वास नेण्यासाठी अधिक प्रयत्न करणार आहेत. त्यांच्या निवडीबद्दल संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, राज्य सल्लागार प्राचार्य डॉ वसंत बिरादार पाटील,मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते- पाटील राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, राज्य सांस्कृतिक प्रमुख प्रशांत विलणकर, राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे विनायक सोळसे, महेश जाधव, विशाल पवार, राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राजू जाधव, दशरथ अडसूळ, अशोक इंगवले, साईनाथ जाधव, नवनाथ कापले, शमशुद्दीन शेख, महिला उपाध्यक्षा सविता चंद्रे, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, युवा राज्याध्यक्ष डॉ. नितीन शिंदे, युवा कार्याध्यक्ष प्रशांत राजगुरू, विदर्भ अध्यक्ष केशव सवळकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुभाष चिंधे, कार्याध्यक्ष शशिकांत पोरे, संपर्क प्रमुख जय कराडे, मराठवाडा संघटक बा.पू.गायकर,मराठवाडा महिला अध्यक्षा सुमती व्याहाळकर, कार्याध्यक्ष हुकूमत मुलाणी, संपर्क प्रमुख आनंद भालेराव, कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार, संपर्क प्रमुख संतोष वाव्हळ, कोकण महिलाध्यक्षा दीपिकाताई चिपळूणकर, कोकण संघटक श्रीराम कदम, कोकण उपाध्यक्ष योगेश भामरे, कायदेविषयक सल्लागार ॲड. अमोल सकट, ॲड. रत्नाकर पाटील, ॲड.जितेंद्र पाटील, ॲड परेश जाधव, विठ्ठल शिंदे, नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष भारत सोनकांबळे, जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव सोनकांबळे, महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्ष व तालुका पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post