ता उमरी: सज्जा बोळसा ग प येथील कामचुकार ग्राम महसूल अधिकारी बि जी पाटील हे सज्जा मुख्यालयी राहत नाहीत. परंतु दर महिन्याला शासनाकडुन पगार उचलायला मात्र चुकत नाहीत. अशा कामचुकार ग्राम महसूल अधिकारी बि जी पाटील यांना त्वरित निलंबित करावे. म्हणून भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी निमंत्रीत सदस्य तथा पत्रकार दैनिक लोकनेता ग्रामीण तालुका प्रतिनिधी उमरी यांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदार उमरी यांना लेखी निवेदन सादर केलेले आहे.
सविस्तर माहिती अशी की सज्जा बोळसा ग प येथील ग्राम महसूल अधिकारी बि जी पाटील यांना तहसीलदार उमरी यांनी माहे नोव्हेंबर - डिसेंबर २४ मध्ये कुदळा येथील श्रीमंत व धनदांडग्या बोगस राशन कार्ड धारकांची व श्रावण बाळ व इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजनेतील श्रीमंत व धनदांडग्या लाभधारकांची चौकशी करून सदर कार्यालयात आव्हाल सादर करावे म्हणून तहसीलदार उमरी यांनी त्यांच्या नांवे नोटीस दिली होती परंतु सदर कामचुकार व मग्रूर ग्राम महसूल अधिकारी बि जी पाटील यांनी चौकशी आज करतो उद्या करतो असे आश्वासन देऊन बोगस लाभार्थी सोबत हातमिळवणी करून सदरील बोगस लाभार्थ्यांची चौकशी न करता त्यांची पाठराखण केलेला आहे. याबाबत निवेदन कर्ते किशनदादा गायकवाड यांनी डिसेंबर २४ पासून त्यांची भेट घेण्यासाठी सज्जा ठिकाणी व तहसील कार्यालय उमरी येथे शेकडो वेळा चक्करा मारीत आहेत परंतु गायकवाड यांना ग्राम महसूल अधिकारी बि जी पाटील अद्याप भेटलेला नाही. तर सर्व सामान्य नागरिक व शेतकरी, विध्यार्थी व महीलाचे काय हाल होत असतील. म्हणून गायकवाड यांनी त्यांच्या विरोधात तहसीलदार साहेब उमरी यांना लेखी निवेदन दिले असून मुख्यालयी राहुन कर्तव्य पार न पाडणा-या कामचुकार, मग्रूर व भ्रष्ट ग्राम महसूल अधिकारी बि जी पाटील यांना त्वरित पदावरून निलंबित करावे.अन्यथा सदर ग्राम महसूल अधिकारी आपल्या पत्राला पायदळी तुडवून कामाला दांडी मारीत असेल तर जिल्हाधिकारी नांदेड यांचेकडे निलंबनाबाबत लेखी कळवुन कामचुकार व मग्रूर ग्राम महसूल अधिकारी बि जी पाटील यांना त्वरित निलंबित करावे. अन्यथा यांच्या पाठीशी अपला हात आहे. असे गृहीत धरून आपल्या कार्यालया समोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
मा संपादक साहेब
आपणांस विनंती की आपल्या लोकप्रिय दैनिकांमध्ये वरील बातमी प्रकाशित करावे ही विनंती.
