मोजे सायखेड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती थाटामाटात साजरी
मोजे सायखेड (ता.धर्माबाद) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, प्रज्ञावंत विश्वभूषण, परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती मोजे सायखेड येथे मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरी करण्यात आली.
प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही 20 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 वाजता भीमजयंतीचे अध्यक्ष प्रवण प्रल्हाद डुमणे यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे आरोहण करण्यात आले. या वेळी उपाध्यक्ष गौतम गंगाराम डुमणे, सचिव शंकर परमेश्वर डुमणे, कोषाध्यक्ष पोताजी विठ्ठल डुमणे, सदस्य चंद्रकांत लक्ष्मण डुमणे, भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष कैलास अर्जुन डुमणे, पोलीस क्राईम तपास पत्रकार विजय भीमराव डुमणे, बळीराम गंगाराम सोनकांबळे, व्यंकट गोरठेकर, पत्रकार एकता महासंघाचे ग्रामीण तालुकाध्यक्ष आवनदास वाघमारे, हसनाळीकर आणि नमिता संभाजी डुमणे (जारिकोट प्रतिनिधी) यांची उपस्थिती होती.
धर्माबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोकडे साहेब आणि त्यांच्या टीमने देखील कार्यक्रमाला उपस्थिती लावून सुरक्षिततेची जबाबदारी पार पाडली.
या भव्य सोहळ्याची सायंकाळी 5 वाजता पारंपरिक पद्धतीने आयोजित भव्य मिरवणुकीने झाली, ज्यामध्ये अनेक कार्यकर्ते, स्थानिक नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.