वनविभागाच्या आशिर्वादाने लाकुडतोड माफियांचा धुमाकूळ.
बेलदारा बीटमध्ये वृक्षतोड नित्याचीच.
खाजगी इसमाकडे बेलदारा बिटचा कारभार.
उमरी प्रतीनीधी
उमरी:- तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासून मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड जोमात सुरू आहे बाभुळ. साग. लिंबाच्या हिरव्यागार व डेरेदार झाडांची दिवसाढवळ्या अवैध कत्तल करून लाकूड माफिया खुलेआम विना नंबरचे ट्रॅक्टर टेम्पो आदी मोठ्या वाहनाद्वारे वाहतूक करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे, तालुक्यातील निमटेक,गोळेगाव,बोरजुन्नु,नागठाणा,बेलदारा, तळेगाव ,वाघलवाडा,शिगंनापुर,बिजेगाव,हातणी, जामगाव,कुदळा,बोळसा,राव धानोरा,मनुर.आदी घनदाट वनराई लाभलेली आहे,
अधिकारी कार्यभार सांभाळतो तो एक तरी प्रभावी असतो नाहीतर प्रमोशन घेऊनच जातो, खरीप हंगामानंतर लाकूड माफी जागरूक झाल्याचे चित्र दिसून येत चाहे वक्षतोडीच्या माध्यमातुन डोके वर काढले असून दिवसाढवळ्या वनविभागाच्या नाकावर टिचून शहरातून व ग्रामीण भागातून अवैधरित्या लाकूड वाहतूक करत असल्याचे चित्र दिसून येत आहेत संबंधित वन विभाग मात्र याबाबत आनिभिज्ञ असल्याचे बोलले जात आहे, प्रशासनाचे डोळेझाक. शहरात वन विभागाचे कार्यालय नागरिकांना माहीत नाहीत त्यातच कर्मचारी बघ्याची भूमिका घेत असून महसूल विभागाकडून देखील याकडे जाणीवपूर्वक डोळे झाक होत आहे त्यामुळे या लाकूड माफीयावर कृपादृष्टी कोणाची? वन विभागाची की राजकीय पुढार्यांची? असा सवाल केला जात आहे, वन विभागच्या दुर्लक्षामुळे हिरव्यागार व डेरदार वृक्षांची कत्तल करणाऱ्यांचे चांगलेच फावत असल्याचे दिसत आहे.दररोज बघायला मिळत आहे.खाजगी ईसमा मारफत वनरक्षक मात्र आपले पाकीट गरम करत असल्याचे चित्र बेलदारा बिट मध्ये पहावयास मिळत आहे.एक खाजगी इसम बेलदारा बिट मध्ये हप्ते वसुली करत आहे असे मत वृक्षप्रेमीकडुन ऐकण्यास मिळत आहे या अवैध वृक्षतोडीला आळा बसेल का? असा प्रश्न पडला आहे.
