सुषमा ताई पाखरे यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट साहित्य रत्न पुरस्काराने सन्मानित.
वर्धा जिल्हा प्रतिनिधी : प्रा दिनेश राठोड
वर्धा : ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन, वर्धा जिल्हा च्या वतीने देण्यात येणारा साहित्य लेखनातील साहित्यरत्न पुरस्कार प्रसिद्ध साहित्यिक सुषमाताई पाखरे वर्धा यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त पंचशील बौद्ध कमिटी नांदोरा काचनुर तालुका आर्वी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट साहित्यरत्न पुरस्काराने संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. गजानन सयाम यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. शॉल , श्रीफळ सन्मानचिन्ह, सन्मानपत्र बुका देऊन देऊन गौरविण्यात आले.
सुषमाताई ह्या उत्कृष्ट व्याख्यात्या, साहित्यिक, निवेदिका ,एकपात्री नाट्य कलावंत, आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. आज पर्यंत त्यांना अनेक नामवंत पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. सुषमाताई यांचे प्रकाशित साहित्य याप्रमाणे आहे मनस्विनी प्रतिनिधिक कविता संग्रह,विनय संस्कार हिंदी, मी आई रमाई बोलते एक पात्री नाटिका, क्रांतीज्योती कवितासंग्रह, संपादन, युगस्वी सावित्रीबाई फुले जीवनदर्शन, बोधिसत्वाच्या पाऊलखुणा लेखसंग्रह. अप्रकाशीत आगामी साहित्य, विनय आणि संस्कार,, मराठी अनुवाद , सावित्री आईच्या कविता, विचारधन वैचारिक लेख संग्रह इत्यादी साहित्य प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.
या पुरस्काराबद्दल संघटनेचे राज्य सहसचिव प्राचार्य राकेश कुमार कोडापे, प्रभाकरराव उईके ,जिल्हासरचिटणीस, श्री मारोती सयाम,जिल्हा संघटक, श्री महादेव कंगाली,कार्याध्यक्ष,श्री आनंद उईके, कोषाध्यक्ष,श्री गंगाधर पुरके(उपाध्यक्ष), संतोषराव मरसकोल्हे, श्री मदन कन्नाके,सतीश कोरचे,दिनेश मडावी,रेखाताई जुगनाके श्री ज्ञानेश्वराव मडावी श्री विजयराव जुगनाके, नरेंद्रजी तोडासे, श्री हरीदासजी कुरसुंगे, शंकरराव मसराम, श्री राजू कंगाले,मनोहर पंधरे,महेश मसराम, आशिष कुंभरे इत्यादी कार्यकर्त्यांनी सुषमाताईंचे अभिनंदन केले.
