भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत निर्माण व्हावा. डॉ.गजानन सयाम.



भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत निर्माण व्हावा. डॉ.गजानन सयाम.


वर्धा जिल्हा प्रतिनिधी : प्रा दिनेश राठोड


वर्धा : बाबासाहेबांनी आजन्म विद्येची उपासना केली.जगात ज्ञानाचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे बाबासाहेब जर आपला आदर्श असतील तर आपण देखील उच्च शिक्षित झालोच पाहिजे. शिक्षणाने विवेक जागृत होतो. ताठ मानेने जगायला शिकतो आणि स्वाभिमान तेवत राहतो अशी स्वाभिमानी जमात तयार होण्यासाठी शिक्षण हे वाघीणीच दूध प्राशन केलं पाहिजे. सोबतच विद्येला विनय आणि शिलाची जोड असली पाहिजे. शिष्टाचार जर तुमच्यात असेल आणि तुम्ही शीलवान असाल तर अनेक वर्षापर्यंत तुमच्या जगण्याची छाप पडत असते. एक आदर्श समाज निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांचा आदर्श पुढे ठेवून आपण शीलसंपन्न, चरित्रसंपन्न झालो पाहिजे.हाच खरा धम्म मार्ग होईल हाच वारसा आपल्याला मिळालेला आहे, यानेच खरे तर बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण होईल. विहाराला संस्कार केंद्र बनवा दर रविवारला छोट्या मुलांवर संस्कार होतील अशा विविध बाबींवर अध्ययन अध्यापन तिथे झाले पाहिजे. पुस्तकांची ओढ लागली पाहिजे. पुस्तकांवर प्रेम करणारा, पुस्तक वाचून जाणकार ,जाणता झालेला समाज हा कोणाचाही दावणीला बांधलेला नसतो तर ,तो समाजाची वेगळी स्थिती निर्माण करू शकतो. दिशा देऊ शकतो.एवढे सामर्थ्य समाजात निर्माण होतं ते फक्त उच्चशिक्षित असल्याने आणि शीलवान असल्याने म्हणून प्रज्ञावंत आणि शीलवंत समाज निर्माण करण्यासाठी आपण जबाबदारी घेऊया. संकल्प करूया विहाराला संस्कार केंद्र बनवण्याकडे अधिक लक्ष देऊया त्यानेच तर जमिनी कार्य होईल आणि निश्चितच चांगल्या प्रकारे समाज तयार होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. पंचशील कमिटी नांदोरा, काचनूर इथल्या लोकांनी जे सामाजिक भान जपून दान दिलं आणि विहारांमध्ये अशा वस्तू निर्माण केल्यात की ज्यांच्यामुळे आपण खऱ्या अर्थाने आर्थिक बाबींचा नियोजन केलंल दाखवून दिले. आणि जयंतीला उपयुक्त असणाऱ्या वस्तू उभ्या केल्यात त्यामुळे कुठेही भाडे जात नाही. तर उलट त्यातून कमाई होते. आणि ही अशी आर्थिक जान आपल्या विहारासाठी उपयुक्त ठरते. तेव्हा हे काम अतिशय स्तुत्य आहे. अशाच पद्धतीने समाजासाठी उपयुक्त असणाऱ्या बाबी तयार करूया.छोटे छोटे उद्योग, आपल्या बँका होणे आपले पैसे आपल्याकडे राहणे फारच आवश्यक आहे. सोबतच सामाजिक मान देताना ते म्हणाले की सर्व दलित, आदिवासी बहुजन अल्पसंख्यांक ह्या सर्वांनी एकत्र येऊन एकजूट होऊन आजचं दिशा ठरविली पाहिजे. प्रति क्रांती करणाऱ्यांची तोंड आणि हिम्मत वाढलेली आहे. तेव्हा आपली स्वतःची त्यापासून सुरक्षा करण्यासाठी आपण एकजुटीने काम केलं पाहिजे. एकजूट असाल तरच खऱ्या अर्थाने तुम्ही शिक्षित आहात असे म्हणता येईल. तेव्हा सर्व बहुजन वर्गांनी दबलेल्या पिचलेल्या,वंचित पीडित सर्व लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे ज्यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, इतर मागास म्हणजे ओबीसी वर्ग,आणि अल्पसंख्यांक लोकांना हजारो वर्षापासून येथे पिळल्या गेले होते तिथे छळल्या गेले होते त्या सगळ्यांनी आज एकजूट होऊन आपल्या देशांना बुडण्यापासून वाचवलं पाहिजे पुन्हा एकदा संघटनेतून शक्ती निर्माण होत असते आणि त्यातूनच नवीन भारत आपण निर्माण करू शकतो आणि आजचं म्हणजे अतिशय अराजक वास्तव ते बदलू शकतो. आपण भानावर आल्यावरच खऱ्या अर्थाने

 आपल्याला 'युनिटी इज द पावर' हे कळेल तेव्हा बांधवांनो एक संघटित व्हा ; असा एक संदेश यावेळी मा. प्रा.डॉ.गजानन सयाम अध्यक्षिय मार्गदर्शन करतांना बोलतहोते.

         ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन तर्फे देण्यात येणारा यावर्षीचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट साहित्यरत्न पुरस्कार सुषमाताई पाखरे वर्धा यांना प्रदान करण्यात आला.शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह , सन्मानपत्र बुके देऊन 134 व्या जयंतीचे अध्यक्ष तथा ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन,वर्धा जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. गजानन सयाम यांच्या हस्ते सुषमाताईंना प्रदान करण्यात आला.

प्रमुख मार्गदर्शक साहित्यिक सुषमाताई पाखरे यांनी मार्गदर्शनपर भाषणात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकून त्यांच्या जीवनातील विविध पैलू उलगडून दाखविले. प्रमुख वक्ते प्रा. गंगाधर दवंडे.प्रा. लांडगे,विशेषअतिथी प्रवीण पाटभाजे, माजी पंचायत समिती सदस्य नितीन भाऊ अरबट, माजी पंचायत समिती सदस्या सुचिताताई पुणेवार, प्रल्हादराव पुणेवार, प्रशांत भाऊ घंटेवार, ज्ञानेश्वर जिचकार, गजानन खिराळे, प्रास्ताविक सुधाकरराव नाईक यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार इरशाद शेख यांनी केले.             

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त गोंडी नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती प्रथम क्रमांक राणी दुर्गावती नृत्य कला मंडळ दहेगांव (गोंडी),यांना 3000 रोख रुपये देण्यात आले. द्वितीय पुरस्कार पंचशील कमिटी नृत्य मंडळ, नांदोरा (काचनूर )यांना २००० रुपये रोख देण्यात आले . तर तृतीय क्रमांक अपेक्षा गजबे यांना 1000 रुपये रोख देण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मोरेश्वर पेंदाम, लक्ष्मण उईके ,शंकर वराडे, मुकेश पुणेवार ,प्रज्ञा मांडगावकर, संतोषराव सिरामे ,देवराव कांबळे, लोकेश नाईक ,प्रशांत चौरे, विलास बारसागडे ,पुरुषोत्तम तागडे, सागर मोटघरे ,नंदू गजरबे दिलीप तागडे, प्रवेश पाटील, प्रफुल्लम मेंढे, जनार्दन आहाके, नरेश पाटील, रंगराव पाटील, विनोद वाघमारे ,अमोल शेंडे, निळकंठ चौरे ,केशव चौरे ,दत्तराज वैद्य, स्वप्निल मेश्राम, भीमराव मलगाम, एकनाथ अंबुलकर, प्रवीण सयाम, इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post