विसरू नको रे आई बापाला....
मनोरंजनातून प्रबोधन...
श्री ओंकारेश्वर देवस्थान दाभडी येथे कूऱ्हा येथील प्रतिष्ठित नागरिक रुपेश आडे यांच्या बहिणीचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यात पाहुणे मंडळी चे मनोरंजन व प्रबोधन व्हावे या हेतूने आडे परिवाराने प्रसिद्ध गायक तथा प्रबोधनकार सुनिल चव्हाण यांच्या जिव्हाळा कला संचास् निमंत्रित करून पाहुणे मंडळींना मनोरंजना बरोबर प्रबोधनाची मेजवानी दिली.संचातील कलावंत ऑर्गन प्लेअर डी.जी.साखरे .ढोलकी सम्राट अशोक इंगोले .तबला वादक शिवाजी चवरे. ऑक्टोपॅड राजेश मेश्राम.गायक अंकुश कोटरंगे .गायिका कल्पना मस्के.गायिका रक्षा राघोर्ते आणि स्त्री व पुरुष च्या आवाजात गायन करणारे सुनिल चव्हाण यांनी सुंदर अशी आप आपली कला सादर केली.विष्णू शिंदे आणि सोपान कोकाटे यांच्या लेखणीतून साकार झालेलं गीत ..विसरू नको रे आई बापाला झिजविली ज्याने काया.मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया...हे गीत गाऊन उपस्थितांना अक्षरशः भारावून टाकले .रुपेश आडे यांच्या हस्ते सुनिल चव्हाण यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला.
