माहेर संस्थेच्या नावाने लग्न लावून देतो अशी फसवणूक
माहेरच्या नावाने लग्नासाठी मुली आहेत असे सांगून गरीब गरजू लोकांची फसवणुकीचा प्रकार
पुणे जिल्हा प्रतिनिधी गोंवीद गव्हले
गेल्या सहा वर्षांपासून सुरु आहे माहेरला अनेक लोकांचे फसवणूक झाल्याचे फोन कॉल्स आले की त्यांची कशी फसवणुक झाली की लग्नासाठी मुलगी दाखवतो आम्ही माहेर संस्थेचे आहोत असे सांगुन माहेरच्या नावाने त्यांच्याकडून पाच हजार दहा हजार अशी विविध रक्कम ऑनलाईन पैसे घेतले जातात त्यानंतर त्वरित फोन बंद केला जातो या अशा अनेक घटनांना माहेर संस्था वडु बुद्रुक ता. शिरूर जि. पुणे यांनी त्वरित शिक्रापूर पोलीस स्टेशन तसेच चंदन नगर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे माहेरच्या नावाने लोकांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई होण्यासाठी केस दाखल केलेली आहे
परंतु अध्याप त्या व्यक्तीवर कोणतेही कारवाई केली गेली नसल्यामुळे अजूनही नगर, भिवंडी, जालना, कोल्हापूर,सातारा,पुणे,अशा अनेक जिल्ह्यातील महाराष्ट्रातील गरीब व गरजू लोकांनची फसवणूक होत आहे प्रत्येक ठिकाणी माहेरच्या फोटोचा उपयोग केला जात आहे पण प्रत्यक्षात माहेर ही संस्था कोणाकडून एकही रुपया न घेता आत्तापर्यंत 204 लग्न मुली /पुरुषांचे केल आहेत माहेर संस्था स्वयंसेवी संस्था गेल्या 27 वर्षापासून निराधार,अनाथ, महिला, पुरुषांना आधार देऊन प्रेमाने सांभाळून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करून त्यांचे नवजीवन दिले जाते आपल्या आसपास जर कोणी माहेर संस्थेच्या नावाने पैसे अथवा काही मागत असेल तर तात्काळ संपर्क साधा माहेर संस्था मुख्य कार्यालय वडू बुद्रुक तालुका शिरूर जिल्हा पुणे रमेश चौधरी यांच्याशी संपर्क साधावा मो.९०११५९४७५७
