सौ.कंबळबाई मिसलवाड यांचे निधन
नांदेड प्रतिनिधी नां
देड- मौजे कबीरवाडी ता. देगलूर येथील जुन्या पिढीतील ज्येष्ठ महिला सौ. कंबळबाई हनमंतराव मिसलवाड यांचे दि. १३ सप्टेंबर शुक्रवार रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्या ८२ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात्त पती, एक मुलगा, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर आज दि. १४ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास मौजे कबीरवाडी ता. देगलूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सौ. कंबळबाई मिसलवाड ह्या वयोवृद्ध ग्रामीण कलाकार म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांची निवड केली होती. त्यांनी ग्रामीण भागामध्ये धार्मिक, सामाजिक व जनजागृतीपर विविध गीत गायनाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन केल्यामुळे पंचक्रोशीत त्यांची चांगली ओळख होती. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. कंबळबाई मिसलवाड ह्या एसटी मेकॅनिक तथा सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच. मिसलवाड यांच्या त्या मातोश्री होत.
