आचार्य भणसाळी महाराज यांची 42 वी पुण्यतिथी उत्साहात साजरी

 




राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विश्वासू सहकारी व स्वातंत्र संग्राम सेनानी पुज्यनिय आचार्य योगीराज भणसाळी महाराज यांचा 42 वा पुण्यतिथी सोहळा दिनांक 12 ते 16 ऑक्टोंबर 2024 ला भणसाळी ग्रामसेवा मंडळ टाकळी व समस्त गावकरी यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. या सोहळया दरम्यान प्रथम दिवशी आचार्य भणसाळी महाराज यांच्या समाधीवर दस-याला सोनपत्र अर्पण करण्यात आले. दुस-या दिवशी भणसाळी मागास मुलींचे व मुलांचे वसतिगृहच्या विद्यार्थ्यांनी दुपारी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. तिस-या दिवशी सकाळी योगसमिती सावनेर यांच्याद्वारे योगप्रशिक्षक भरत थापा व राहूल सावजी यांनी योगशिबीराचे आयोजन केले. चौथ्या दिवशी दुपारी आचार्य भणसाळी महिला भजन मंडळ द्वारा संकिर्तन व भजन करण्यात आले. तसेच भणसाळी बुनियादी विद्यामंदीर टाकळी शाळेच्या वतीने विद्यार्थीनींकरीता रांगोळी स्पर्धेचे आयोजित करण्यात आले. याचदिवशी जेष्ठ स्वातंत्र संग्राम सेनानी तथा आचार्य भणसाळी महाराज यांच्या मानसकन्या पुष्पाबेन देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जेष्ठ समाजसेविका लिलाताई चितळे, साहित्यीक सागर खादीवाला, अविनाश बागडे, प्रविण पालीवाल, विवेक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत योगीराज भणसाळी महाराज यांना सायंकाळी 06:35 मिनीटांनी मौन श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी मान्यवरांनी आचार्य योगीराज भणसाळी महाराज यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. सोहळ्याच्या शेवटच्या दिवशी सकाळी 09 वाजता नणसाळी ग्रामसेवा मंडळ टाकळी, गावकरी भजन मंडळ यांनी बणसाळी महाराज यांच्या पालकीसह संपूर्ण गावातून शोभायात्रा काढली. त्यानंतर आश्रमातील गोकुळ येथे सकाळी 11:00 वाजता ह.भ.प. भुसारी महाराज यांचे गोपाल काल्याचे किर्तन झाले. किर्तनानंतर उपस्थित सर्वांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.


सदर पुण्यतिथी महोत्सव सोहळा यशस्वी करण्याकरीता भणसाळी ग्रामसेवा मंडळ टाकळीचे सर्व पदाधिकारी, भणसाळी बुनियादी विद्यामंदीर टाकळी शाळेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, भणसाळी मागास मुला-मुलींचे वसतिगृह अधिक्षक व कर्मचारी, आश्रमीय सर्व कार्यकर्ते, गुरूदेव सेवा मंडळ टाकळीचे सर्व सदस्य तसेच गावकरी मंडळी यांनी मोलाचे सहकार्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post