भणसाळी बुनियादी विद्यामंदीर टाकळी च्या स्काऊटच्या विद्यार्थ्यांचा सेवाप्रकल्पात सहभाग

 



प्रितम टेकाडे जिल्हा विशेष प्रतिनिधी


स्काऊट विभागाच्या वार्षिक उपक्रमाअंतर्गत भणसाळी बुनियादी विद्यामंदीर टाकळी तह. सावनेर शाळेतील सर्व स्काऊटस यांनी जिल्हा संघटक सत्यशिल पाटील यांच्या मार्गदर्शनात स्काऊटर प्रितम टेकाडे हयांच्या नेतृत्वात सेवा प्रकल्प ह्या उपक्रमात सहभाग घेतला.


आचार्य योगीराज भणसाळी महाराज यांचा 42 वा पुण्यतिथी सोहळा दिनांक 12 ते 16 ऑक्टोंबर 2024 या कालावधी दरम्यान भणसाळी ग्रामसेवा मंडळ टाकळीच्या गोकुळ येथे आयोजित सर्व कार्यक्रमांमध्ये शाळेतील स्काऊटस यांनी सहभाग घेतला. यावेळी स्काऊटस् यांनी कार्यक्रमादरम्यान शांतता राखणे, आश्रम सफाई करणे, भणसाळी महाराज समाधी परिसर स्वच्छ करणे व सजविणे, कार्यक्रमास उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करणे तसेच उपस्थितांना नाश्ता, चहा-पाणी देणे. प्रभात फेरीच्या वेळी सर्व विद्यार्थ्यांना लाईनमध्ये लावणे, कार्यक्रमादरम्यान गडबड, गोंधळ होवू न देणे, तसेच शिस्त राखणे, महाप्रसादाचे वितरण करणे. इत्यादी कामे स्काऊटस् यांनी स्वयंस्फूर्तीने करून सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्याकरीता मोलाचे सहकार्य केले.


पुण्यतिथी सोहळा समाप्तीनंतर भणसाळी ग्रामसेवा मंडळ टाकळी तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. गहेरवार यांनी सर्व स्काऊटस्नी केलेल्या कार्याची प्रशंसा करून स्काऊटर प्रितम टेकाडे, शाळेचे स्काऊटस् तसेच मार्गदर्शक सत्यशिल पाटील यांचे आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post