भणसाळी बुनियादी विद्यामंदीर टाकळी येथे वाचन, प्रेरणा दिन साजरा


भणसाळी बुनियादी विद्यामंदीर टाकळी येथे वाचन, प्रेरणा दिन साजरा


प्रितम टेकाडे जिल्हा विशेष प्रतिनिधी


भणसाळी बुनियादी विद्यामंदीर टाकळी तह. सावनेर शाळेत माजी राष्ट्रपती तथा मिसाईम मॅन डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून जिल्हा संघटक सत्यशिल पाटील यांच्या मार्गदर्शनात स्काऊटर प्रितम टेकाडे हयांनी शाळेतील स्काऊट विभागातर्फे साजरी केली.


शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. गहेरवार यांनी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला माल्यार्पन करून पुजन केले. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना ग्रंथालयातील त्यांच्या आवडीचे पुस्तक वाचण्यास दिले. त्या पुस्तकांचे विद्यार्थ्यांकडून वाचन सुध्दा करून घेतले. शाळेतील जेष्ठ शिक्षक पंकज चारथळ यांनी डॉ. कलाम यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. डॉ. अब्दुल कलाम यांनी विपरीत परिस्थितून यशस्वी जीवनाचा मार्ग कसा शोधला याबाबत स्काऊटर प्रितम टेकाडे हयांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.


कार्यक्रमाचे संचालन स्काऊट सुजल रघुकूले यांनी केले तर आभार प्रदर्शन स्काऊट वैभव बावनकर यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post