पवारांच्या प्रचार सभेकडे नागरिकांनी फिरवली पाठ
उमरी प्रतिनिधी राहुल सोनकांबळे
भाजप महायुतीचे उमेदवार राजेश पवार ●
यांच्या प्रचारार्थ नव्यानेच निवड झालेल्या विधान परिषदेच्या आमदारांची सभा आयोजित केली होती मात्र ऐनवेळी या सभेकडे नागरिकांनी पाठ फिरविल्याने सकाळी अकरा वाजेची सभा असताना तीन वाजेपर्यंत मतदारांनी पाठ फिरवल्याने हि सभा ऐनवेळी रद्द करण्यातऐनवेळी सभा करावी लागली रद्द आल्याचे संयोजकांनी सांगितले. यावेळी जमलेल्या मोजक्या नागरिकांनी खिचडीवर ताव मारून वाट धरली. ऐनवेळी सभा रद्द झाल्याने उमेवार पवारांवर आल्याने सध्या तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले. भाजपच्या सभेला संबोधित करणाऱ्यांना समाजातील जेष्ठ लोकांनी विरोध दर्शविला त्यामुळे त्यांचा अचानक दौरा रद्द झाला की त्यांनीच ऐनवेळी सभेकडे पाठ फिरवल्याची चर्चा आहे. सध्यातरी भाजपकडून शहरात जाहिर सभा झाली नसून याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. या सभेत मराठा बांधव अडचणीत आणतील आणि सभा उधळुन लावतील या भितीपोटी भाजपच्या उमेदवाराने सभास्थळी मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. मराठा आंदोलकांना उमरो पोलिसांकडून नोटिसा बजावण्यास भाग पाडले. तर सभा ऐनवेळी बारगळल्याने या समाजातील लोकांत भाजपच्या आमदारांवर रोष दिसून येत असल्याचे चित्र आहे.
