पक्षश्रेष्टी विनाचं माजी आमदार राजेश पवार हवेत स्वार*त्यांच्या एकला चलोरे पणामुळे कार्यकर्ते कोमात

 


*पक्षश्रेष्टी विनाचं माजी आमदार राजेश पवार हवेत स्वार*त्यांच्या एकला चलोरे पणामुळे कार्यकर्ते कोमात*


*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*


*नांदेड*:दि. १५.जिल्यातील लोकसभा पोटनिवडणूक पोट निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे.अशात नायगाव विधान सभेचे आ.राजेश पवार यांनी भाजपच्या वरिष्ठ नेते व लोकसभा उमेदवार संतुकराव हंबर्डे यांच्या फोटोविना आपले एकट्याचेच हवेतील भली मोठी फुगे निवडणूक प्रचारासाठी  पवार हवेच्या फुग्यावर सवार झाल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.


आ.राजेश पवार यांच्या एककलमी कार्यक्रमाने आधीच भाजपच्या पुढार्यांची मने दुखावल्याने सर्व जण त्यांच्या निवडणूक प्रचारापासून चार हात दूर झाले आहेत,अशात मतदार संघातील बहुतांश नेतेमंडळी व कार्यकर्ते यांनीही त्यांच्या निवडणूक प्रचाराकडे जाहीरपणे पाठ फिरवलेली असताना पवार यांनी निवडणूक प्रचारासाठी मतदार संघात ठिकठिकाणी भाजप ध्वज रंगाची एकट्याच्या फोटोसह भली मोठी हवेतील फुगे सोडली आहेत.या फुग्याची हवा निघेल, अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे. 


पक्ष श्रेष्टी व लोकसभा उमेदवार संतुकाराव हंबर्डे यांचा फोटो न टाकता एकटेच राजेश पवार यांनी नायगाव मतदार संघात शहर गावातील हवेतील फुग्यावर लोकसभा उमेदवार डॉ संतुकराव हंबर्डे याना वार्यावर सोडून देऊन आपल्या एकट्याचाच प्रचार करत एकच फोटो टाकल्याने राजेश पवार, हे हवेमध्ये एकटेच सवार होऊन लोकसभेला आपल्याच पक्षाच्या घात करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा गावा गावात रंगत आहे.   


नायगाव विधान सभा मतदार संघात सध्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असून सर्वत्र करकश आवाजात भोंगे लावून सर्व जन आपली निशाणी मतदाता यांच्या कानावर घालत असून हवे मध्ये मोठमोठ्या गावात व शहरात फुग्यात हवा भरून आपले चिन्ह व फोटो टाकून आपला प्रचार हवेतून करताना भाजप व काँग्रेस हे दोनच पक्ष दिसत आहेत. एकीकडे काँग्रेस ने लोकसभा उमेदवार प्रा.रवींद्र चव्हाण यांचा फोटो फुगा वर टाकून आपली संस्कृती जोपासली असून तर दुसरीकडे आपल्याच तोर्यात असलेल्या भाजप उमेदवार राजेश पवार यांनी चक्क एकट्याचाच फोटो छापून लोकसभेच्या उमेदवारांची साथ सोडून दिल्याचा संदेश दिला आहेका अशी चर्चा सर्व सामन्यातून होत आहे. 


नायगाव मतदार संघात सध्या सर्वच पक्ष म्हविकास आघाडी,महा युती, वंचित बहुजन आघाडी यांनी सभाचा,वर कॉर्नर बैठका,प्रचार रैली,आदी चा धडाका लावला असून भाजप चे राजेश पवार समर्थक काही प्रचारक काँग्रेस लोकसभा उमेदवारांची सहानुभूती समजून घेऊन विधान सभेला आम्हाला मतदान द्या असे हलक्या हळू आवाजात म्हणत आहेत अशी चर्चा नायगाव मतदार संघात एकण्यात आहे.


नायगाव विधान सभा मतदार संघात प्रचार सध्या जोमाने असून अनेक जणांची चांदी तर काहींचे सोने झाल्याची चर्चा आहे पक्ष संघटनेचे पाच उमेदवार तर पाच अपक्ष असून त्यातील एकाने भाजप उमेदवार यांच्या वर आरोप करीत काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दिला असून येत्या चार दिवसात कोण कोण कोणाला पाठिंबा देईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post