राष्ट्रीय संविधान बचाव अभियानाचे भाकीत खरे ठरले महाराष्ट्राचा हरियाणा झाला - प्रा. देविदास इंगळे*
राष्ट्रीय संविधान बचाव अभियान च्या माध्यमातून निवडणूकीच्या धामधूमीत यावर लिखाण केलेले होते की ईव्हीएम कडे कानाडोळा केला तर चोर डल्ला मारतील आणि दुसरे ईव्हीएम वर लक्ष केंद्रित केले नाहीतर महाराष्ट्राचा हरियाणा होईल आणि घडले तेच
हा निकाल महाराष्ट्राला अपेक्षित नव्हता सरकार महाविकास आघाडीचे येणार ही जनतेतली चर्चा असतांना महायुतीच्या बाजूने निकाल लागने म्हणजे दाल मे कुछ काला है |या पुरी दालही काली है |
बीजेपी समर्थक उद्योगपती यांच्याच हाती ईव्हीएम पुरविण्याचे टेंडर होते त्यामुळे अशा पद्धतीने निकाल येणे नवल नाही आणि असा निकाल लागला हे जनता मान्य करणार नाही आणि यापुढे स्वतः जनतेला रस्त्यावर येवून काम करावं लागणार हे नक्की.
ईव्हीएम वर बारकाईने लक्ष केंद्रित करणे आणि संविधान व लोकशाही साठी प्रत्येक नागरिकाला काम करावं लागणार आहे.
लोकसभेच्या निकालात हुरळून गेलेल्या जनतेला जागं करणारा हा निकाल आहे.
उठा जागे व्हा जोमाने नेटाने कामाला लागा संविधान व लोकशाही वाचवा.
धन्यवाद
आपला स्नेही
प्रा. देविदास इंगळे
राष्ट्रीय अध्यक्ष
राष्ट्रीय संविधान बचाव अभियान.
