अरे बापरे घुंगराळ्याच्या जिल्हा परिषद शाळेत बाया नाचवणाऱ्यावरं कारवाई करा - स्वप्निल भोसीकर.
नायगाव प्रतीनिधी
नायगाव:- तालुक्यातील घुंगराळा येथे श्री खंडोबा यात्रेचे आयोजन दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात करण्यात आले होते आणि त्या उत्साहाच्या भरात ग्रामपंचायत व आयोजकांच्या वतीने चक्क जिल्हा परिषद शाळेतच बाया नाचवल्या मुळे गावासह पंचक्रोशीतील विद्यार्थी पालक यांनी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली होती कार्यक्रम एवढा रंगला होता की प्रेक्षकांना जागा उपलब्ध आहेत नसल्यामुळे चक्क शाळेच्या इमारतीवर, शाळेच्या कंपाऊंड वॉल वर शाळेतील झाडांवर प्रेक्षकांची तुफानगर्दी जमली होती, महाराष्ट्रात लावणी ही नृत्यकला फारच लोकप्रिय आहे.अशाच लावणीच्या कार्यक्रमात प्रेक्षकांनी तुफान राडा केला. आणि नाचत असताना नृत्यांगना अश्लील चाळे करत चक्क नाबालीक मुलाची पप्पीच घेतली तरी त्यामुळे आता शाळेत असे कार्यक्रम घेत असतील तर त्या विद्यार्थ्यांनी काय आदर्श घ्यावा घुगंराळा हे गाव नांदेड नायगाव या मेन रोडवर असुन इथे आजुबाजुला भरपूर मोकळी जागा असताना जाणुन बुजुन आयोजन करण्याऱ्यानीं शाळेत कार्यक्रम घेतला आहे असा आरोप भिम आर्मीचे जिल्हाध्यक्ष स्वप्निल भोसीकर यांनी केली आहे.या सर्व आयोजकांवर तात्काळ कारवाई करून त्यांच्या वर गुन्हे दाखल करावे अशी मागणी निदनाद्वारे केली आहे.शाळा विद्येचे मंदिर असून तिथे लावणी सारखे कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थी जे देशाचे भविष्य आहे त्यांनी नेमका काय आदर्श घ्यावा हा कार्यक्रम इतर ठिकाणी घेण्यास काही हरकत नव्हती परंतु अशाप्रकारचा कार्यक्रम जिल्हापरिषद शाळेत ज्यांनी आयोजन केले ते पुढारी , ग्रामविकास अधिकारी, शाळेचे केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून निलंबनाची कार्यवाही वरावी ही नम्र विनंती अन्यथा भिमआर्मी संघटने तर्फे तीव्र आंदोलन आंदोलन छेडण्यात येईल आणि याला प्रशासन सर्वस्वी जबाबदार असेल.असेही ते आमच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले.
