प्राचार्य राकेश कुमार कोडापे राष्ट्रीय आदिवासी समाज रत्न पुरस्काराने कानपूर (उत्तर प्रदेश) येथे सन्मानित.
वर्धा जिल्हा प्रतिनिधी : प्रा.दिनेश राठोड
वर्धा: ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन चे नुकतेच 38 वे राष्ट्रीय अधिवेशन कानपूर उत्तर प्रदेश येथे पार पडले. या अधिवेशनात 11 राज्यातील प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्मचारी व अधिकारी यांना राष्ट्रीय आदिवासी समाज रत्न पुरस्कार दिल्या जातो. यावर्षी वर्धा जिल्ह्याला हा बहुमान मिळाला. प्राचार्य राकेश कुमार कुडापे हे सद्यस्थितीत सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार तांत्रिक कार्यालय मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र यवतमाळ येथे कार्यरत आहे. ते ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन चे राज्य सहसचिव, (मुंबई.) म्हणून उत्कृष्टपणे कामगिरी पार पाडत आहे. आदिवासींच्या सामाजिक योगदानाबद्दल प्राचार्य राकेश कुमार कोडापे यांना गोवा राज्याचे अनुसूचित जाती/ जमाती चे अध्यक्ष श्री दीपकजी करमरकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय अध्यक्ष प्रा मधुकरराव उईके, राष्ट्रीय सरचिटणीस श्री विजय जी कोकोडे, राष्ट्रीय संघटक प्राचार्य डॉ. चेतन कुमार मसराम, कार्याध्यक्ष सुरेश भाऊ कन्नाके, सहकार्याध्यक्ष देवा पवार केंद्रीय संयुक्त सचिव मनोज कुमार गोंड महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष यशवंत मलये यांच्या उपस्थितीत सदर पुरस्कार देण्यात आला. या राष्ट्रीय अधिवेशनात जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. गजानन सयाम, तालुकाध्यक्ष महेश मसराम, सल्लागार हरिदासजी कुरसंगे उपस्थित होते.
प्राचार्य राकेश कुमार कोडापे यांना राष्ट्रीयआदिवासी समाज रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा सरचिटणीस प्रभाकर उईके, जिल्हा संघटक मारोती सयाम, कार्याध्यक्ष महादेव कंगाली, कोषाध्यक्ष आनंद उईके, उपाध्यक्ष गंगाधर पुरके, रवींद्र उईके, मदन कन्नाके, संतोष मरसकोल्हे, दिनेश मडावी, सतीश कोरचे, जामुवंत मडावी, सुनील वटे. नंदकिशोर मसराम,माजी केंद्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर मडावी, माजी जिल्हाध्यक्ष विजयराव जुगनाके, राजूभाऊ कंगाले, वसंत वरकडे,अन्नाजी सोयाम, आशिष कुमरे, शंकरराव मसराम, शंकरराव मरसकोल्हे, समस्त तालुका पदाधिकारी यांनी प्राचार्य राकेश कुमार कोडापे यांचे अभिनंदन केले.
