इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय,वडनेर येथे संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी.

 


इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय,वडनेर येथे संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी.


वर्धा जिल्हा प्रतिनिधी : प्रा.दिनेश राठोड


वर्धा : इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय वडणेर ता.हिंगणघाट जि. वर्धा येथे संत गाडगेबाबा जयंती विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरी करण्यात आली. स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जबाबदारी यांचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमाने सर्वांना प्रेरित केले.

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे गाडगेबाबा यांची भूमिका साकारणाऱ्या अमित भोयर यांनी केलेली प्रभावी सादरीकरण. गाडगेबाबांच्या जीवन व विचारांचे दर्शन घडवत त्यांनी उपस्थितांना विचार करायला भाग पाडले.

जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी ग्राम स्वच्छता अभियान राबवले व प्लास्टिकमुक्त ग्राम शपथ घेतली. यानंतर स्वच्छता रॅली काढण्यात आली. रॅलीतून गावकऱ्यांमध्ये स्वच्छता व प्लास्टिकमुक्त वातावरणाच्या महत्त्वाचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमात १० वी च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या "गाडीवाला आला,आता बाह्यरं निघा" या नृत्यप्रकाराने सर्वांचे मनोरंजन केले आणि स्वच्छता व रस्ते सुरक्षेचा संदेशही दिला.

या उपक्रमात शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्साहाने भाग घेतला. त्यांच्या परिश्रमामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला. गावकऱ्यांनी शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक केले व गाडगेबाबांनी दिलेल्या शिकवणीचा स्वीकार करून त्यांचे विचार प्रत्यक्ष जीवनात राबवण्याचे वचन दिले.

कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी मुख्याध्यापकांनी सर्व शिक्षक-विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि अशा उपक्रमांनी समाजाला योग्य दिशा मिळते, असे मत व्यक्त केले. इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय वडनेर हे शिक्षणाबरोबरच सामाजिक जबाबदारीची जाणीव देणारे प्रेरणास्थान ठरले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post