संजय गांधी स्मृती विद्या मंदिर विद्यार्थ्यांना योगासनाचे धडे.
वर्धा जिल्हा प्रतिनिधी : प्रा. दिनेश राठोड
वर्धा : संजय मेमोरियल टीचर्स एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित संजय गांधी स्मृती विद्या मंदिर, हिंगणघाट येथील शाळेमध्ये विद्यार्थ्यांना योगासनाचे धडे प्रात्यक्षिक करून घेण्यात आले या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना सिंग तसेच शाळेचे पर्यवेक्षक दिलीप मिटकर उपस्थित होते शाळेतील क्रीडा शिक्षक बी. एल. खांडरे यांनी योगासना चे महत्व पटून दिले विद्यार्थ्यांना योगासनाचे प्रात्यक्षिक करून दाखविली. या कार्यक्रमाला शाळेतील सहाय्यक शिक्षिका कुमारी ज्योती नंदनवार, तसेच शाळेतील सहाय्यक शिक्षक पी. एन. तेजने सर यांनी सहकार्य केले शाळेतील शिक्षक सुधीर तीनगसे प्रसंगी उपस्थित होते.
