स्व.यशवंतराव चव्हाण समाधीस्थळ आणि 'प्रीत संगम' हे प्रेरणादायी तीर्थक्षेत्र .


स्व.यशवंतराव चव्हाण समाधीस्थळ आणि 'प्रीत संगम' हे प्रेरणादायी तीर्थक्षेत्र .

_______________________________

*○ समाधीस्थळ कृष्णा आणि कोयना नदीच्या संगमावर.

_______________________________

लहानपणापासून यशवंतराव चव्हाण यांच्या बद्दल प्रचंड आदर आणि एक आदर्शयुक्त ओढ आहे. साताऱ्यात गोंडर कादंबरीच्या पुरस्कारा निमित्त आल्यानंतर कराड वरून जावं लागतं. कराड म्हटलं की मला यशवंतराव चव्हाण आणि त्यामुळे तुमचे दर्शन घेण्याची माझी तीव्र इच्छा झाली. कराडच्या मातीत जाऊन दर्शन घेणे म्हणाला पटणारी गोष्ट नाही वेळात वेळ काढून जाण्याचा विचार केला आणि योगायोग असा की कराडच्या कवयित्री कांचन थोरात यांचा फोन आला म्हणाल्या तुम्ही आमच्या करार होऊन जात आहात तर आमच्याकडे या...आणि मी कराडमध्ये थांबलो आणि कराडमध्ये थांबून यशवंतरावांच्या समाधीला गेलो नाही तर,मी स्वतःला माफ करू शकलो नसतो. थोरात मॅडमनी प्रीतसंगमावर आणि समाधीवर जाण्याची सोय केली यशवंतराव चव्हाण यांच्या 'कृष्णाकाठ' 'वेणू' असा साहित्य लेखनाने तर भारून गेलोच पण संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये अग्रस्थानी असलेलं व्यक्तिमत्व मुंबई महाराष्ट्रामध्ये रहावी यासाठीचा लढा सर्वश्रुत आहे. याचे श्रेय संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात लढणाऱ्या क्रांतिवीरांना जातात आणि या क्रांतिवीरांमध्ये अग्रस्थानी असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे यशवंतराव चव्हाण एक निर्मळ,निष्प्रभ आणि राजकारण कसा असावा याचा वस्तूपाठ देणारा एक राजकीय व्यक्तिमत्व राजकीय व्यक्तिमत्वच नाही तर राजकीय व्यक्तिमत्व असून सुद्धा साहित्यिक मनाचा साहित्यिक हृदयाचा आणि साहित्याला पुढे घेऊन जाणारे आदर्श राजकारणी म्हणून त्यांची ओळख आहे. अशा भव्य दिव्य व्यक्तिमत्त्वाच्या यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीवर पोहोचलो समाधीचे दर्शन घेतलं ही समाधी कृष्णा आणि कोयना या दोन नद्यांचा संगम असलेल्या अतिशय सुंदर अशा पवित्र आणि निसर्गरम्य ठिकाणी हे समाधी आहे. सायंकाळची वेळ होती. आणि प्रचंड अशी मंगल आणि सुंदर सजावट त्याचबरोबर लाईटच्या रोषणाईने हा परिसर अगदी उजळून गेला होता..खरच तर आता हे एक पर्यटन स्थळ झालेला आहे.यशवंतरावांची समाधी आणि प्रीत संगम या निसर्गरम्य वातावरणामध्ये प्रचंड गर्दी असते या गर्दीमध्ये मी ही रममान झालो. .निवांत असं यशवंतराव चव्हाण यांचे दर्शन घेतलं कांचन थोरात यांच्या सुकन्या कुमारी वैष्णवी यास परिसर दाखवण्यासाठी माझ्यासोबत होत्या ..अतिशय सुंदर आणि परिपूर्ण माहिती कुमारी वैष्णवी ने दिली आणि काका येथे थांबा.. तिथे थांबा म्हणून त्यांनी सुंदर असे फोटो काढले यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन एक नवीन प्रेरणा एक नवीन ऊर्जा घेऊन आलो आहे. साहित्यिक क्षेत्रात प्रचंड लेखनाने प्रचंड साहित्य चळवळीचे काम करायचे आहे.. हे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीवर सांगून आलो आहे...नक्कीच येणारा काळामध्ये साहित्य लेखन आणि साहित्य चळवळ यशवंतराव यांच्या आशीर्वादाने पुढे घेऊन जाणार आहे. यात आपल्या सर्वांचे सहकार्य असणारच आहे. असा शब्द देऊन यशवंतराव यांच्या समाधीचा निरोप घेतला आणि आज दिवसभर त्यांच्या समाधीचे दर्शन घेतल्याचे चैतन्य मनात दरवळत होते ते कायम असणार आहे एक नवीन चेतना..नवी प्रेरणा प्रोत्साहन आणि साहित्य लेखन चळवळीसाठी प्रचंड असे ऊर्जा घेऊन आलो आहे..ते आपल्या पर्यंत येणारच आहे..

Post a Comment

Previous Post Next Post