अटल बिहारी वाजपेयी हे भारत देशाचे सामाजिक व राजकीय महान राष्ट्रीय नेते- गुणवंत मिसलवाड
नांदेड- आपल्या भारत देशाला राष्ट्रीय नेत्यांची खूप मोठी परंपरा असून आपल्या ९४ वर्षाच्या आयुष्यामध्ये विविध राजकीय पदावर कार्य करुन पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात देश मजबूत बनविण्यासाठी पोखरण अणु चाचणी, महिला सबलीकरण, अंत्योदय योजना, उदारीकरण, सुशासन राबवून कठोर तत्त्वांनिशी भारत देशाच्या विकासासाठी कार्य करणारे भारत देशाचे सामाजिक व राजकीय महान राष्ट्रीय नेते म्हणजे अटल बिहारी वाजपेयी हे होत असे प्रतिपादन एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. गुणवंत एच. मिसलवाड यांनी केले.
ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथे दि. २५ डिसेंबर २०२४ बुधवार रोजी सकाळी ठिक १०.३० वाजता हिंदी कवी, भारतरत्न, पद्मविभूषण, आकरावे माजी पंतप्रधान, लोकनेते अटलबिहारी वाजपेयी यांची १०० वी जयंती सुशासन दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या अभिवादन कार्यक्रम सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. सर्वप्रथम रा.प.म. आगाराचे सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक मा. श्री. विष्णू हारकळ यांच्या हस्ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
पुढे बोलताना ते आपल्या भाषणात यावेळी म्हणाले की, अटलबिहारी वाजपेयी यांनी परराष्ट्र मंत्री असताना संयुक्त राष्ट्र संघात हिंदू मधून भाषण देणारे भारत देशाचे पहिले पंतप्रधान असून देश समृद्धीसाठी सुशासनावर भर दिला. सुशासन म्हणजे भारत देशात पारदर्शी व जबाबदारीपूर्वक नागरी सेवा देणे आणि विशेषतः विद्यार्थ्यांना अवगत करणे हा त्यांचा मूळ उद्देश होता. त्यांनी जय जवान जय किसान जय विज्ञान चा नारा दिला. अशा या बहुआयामी व्यक्तीमत्त्वाचा तुम्ही आम्ही आपण सर्वांनीच आदर्श घेऊन प्रवाशी सेवेबरोबरच समाजाप्रती आणि देशाप्रती कार्य करण्याची ही काळाची गरज आहे, असेही मा.श्री. गुणवंत एच. मिसलवाड यांनी शेवटी बोलताना म्हणाले.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक विष्णू हारकळ, चार्जमन संदीप बोधनकर, वाहतुक नियंत्रक आनंदा कंधारे, सरदार बलजीतसिंघ मेजर, रोखपाल गजानन बाबर, वरिष्ठ लिपीक संदीप ढोले, सुनीता हुंबे, श्वेता तेलेवार, मनिषा कदम, वैष्णवी गंदेवार यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी रा.प.म. आगारातील कामगार कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
