*राजू देवराव कठारे यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या गुन्हेगारांना अटक करा... कॉ. गंगाधर गायकवाड*


 *राजू देवराव कठारे यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या गुन्हेगारांना अटक करा... कॉ. गंगाधर गायकवाड*


*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*


*नांदेड*:दि.२८.शहरातील शिवाजीनगर भागातील लालवाडी येथील दूध व्यवसायिक राजू देवराव कठारे हे नेहमी प्रमाणे दि.२६ रोजी संध्याकाळी साडेसात ते आठ च्या दरम्यान आपल्या घरून आनंदनगर भागातील आपल्या ग्राहकांना दूध देण्यासाठी घरातून दूध घेऊन गेले असता अंदाजे १० ते ११ च्या दरम्यान बाबानगर येथून यशवंत कॉलेज रोड वरील रंसवती मार्ग आपल्या घराकडे येत असताना शहरातील CCTV ने निगराणीत असलेल्या विधी महाविद्यालय(लॉ कॉलेज)बि.ऍड.कॉलेज,कै. शंकरराव चव्हाण साहेबांच्या पुतळ्या पासून काही अंतरावरील वरील रोडवर कोणी तरी त्यांची हत्या केली किव्हा अज्ञात वहानाने धडक दिल्यामुळे त्यांच्या मृत्यू झाला असल्याची फिर्याद शिवाजीनगर पोलीस स्टेशनं येथे मयत राजू देवराव कठारे यांची पत्नी सरू राजू कठारे यांनी दिली आहे. 


पण गेली २७ नोव्हेंबर पासून आज परेंत गरीब मयत राजू देवराव कठारे यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्याचा  कोणताही पुरावा लावण्यात शिवाजीनगर पोलीस स्टेशनंच्या तपासिक अधिकारी यांना शोध लावता आला नाही हे मात्र नवलंच म्हणावे लागेल 


सदरील रोड वर रात्री पोलिसांची २ ते ३ वेळ गस्त असते पण सदरील रोडवर पडलेल्या राजू देवराव कठारे यांना कोणीच कसे बघितले नाही हे मात्र बुद्धीला न पटलेले कोडे म्हणावे लागेल पण तो काही उनाड मुलांच्या मोटार सायकल रायडींगचा बळी तर ठरला नाही ना? त्यामुळे त्याचे आखे कुटुंब क्षणात उध्वस्त झाले आहे.


शहरात सध्या मध्यरात्री अल्पवीन मुलांची एक १५ ते २० जणांची टोळी मोटार सायकल घेऊन रस्त्यावर धिंगाणा घालून येणाऱ्या जाणाऱ्या जनतेवर जीवघेणा हल्ला त्यांच्या कडील मौल्यवान वस्तू हिसकावून घेत गलोगल्ली धिंगाणा घालत फिरत आहेत यांचा शोध घेणे आवश्यक आहे.


मयत राजू देवराव कठारे ह्याच्या  पच्यात आई,एक भाऊ दोन बहिणी,पत्नी,दोन मुली,एक मुलगा असे कुटुंब घरचा करता पुरुष अचानक गेल्यामुळे सध्या मानसिक संतुलन बिघडले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post