पोदार इंटरनॅशनल स्कूल ओझर येथे ख्रिसमस हा सण उत्साहात आणि जल्लोषात साजरा
ख्रिसमस म्हणजे प्रेम, ख्रिसमस म्हणजे आनंद, ख्रिसमस हा नवीन उत्साह आहे.
पोदार इंटरनॅशनल स्कूल ओझर येथे ख्रिसमस हा सण मोठया जोशात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी पोदार इंटरनॅशनल स्कूल पाथर्डी, नाशिक येथील प्रा. नीती जॉनथन या प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या होत्या. शाळेच्या प्रा. डॉ. जसिंथा पारके यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. त्यानंतर कार्यक्रमास सुरवात झाली. या कार्यक्रमानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी आकर्षक नृत्य, प्रभू येशुंची जन्मकथा सांगणारे सुंदर नाटक व मधूर संगीताचे प्रस्तुतिकरण केले. यासाठी विद्यार्थ्यांना कोरिओग्राफर अभिजित मोरे, पंकज जाधव, शिक्षिका पूजा मोरे त्याचबरोबर शाळेतील शिक्षिका कीर्ती शर्मा संगीतशिक्षक रोशन पवार यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेतील सर्व शिक्षिका यांनी देखील लक्षवेधी नृत्याचे सादरीकरण केले. शाळेची विद्यार्थिनी स्तकक्षा क्षीरसागर हिने आपल्या मनोगतातून ख्रिसमस सणाचे महत्त्व सांगितले. अशाप्रकारे शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ठ सादरीकरणातून हा सण अतिशय अविस्मरणीय बनवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक प्रविण कदम यांनी पार पाडले त्याचबरोबर शिक्षिका ऐश्वर्या खुर्दळ यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी शाळेच्या प्रा. डॉ. जसिंथा पारके यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
