*इंदिरा गांधी विद्यालय, वडनेर येथे जागतिक गणित दिवस साजरा*
वर्धा जिल्हा प्रतिनिधी : प्रा.दिनेश राठोड
वर्धा: इंदिरा गांधी विद्यालय, वडनेर ता.हिंगणघाट येथे दिनांक २२ डिसेंबर २०२४ रोजी जागतिक गणित दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना गणिताच्या ज्ञानाची ओळख करून देणे आणि दैनंदिन जीवनात गणिताचे महत्त्व पटवून देणे हे होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक शरद ढाले यांनी विशेष चालना दिली. मडावी मॅडम यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तसेच तलवटकर सर, बारतीने सर, मडावी सर आणि मोनाली मॅडम यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि मुख्याध्यापकांच्या प्रेरणादायी भाषणाने झाली. यानंतर विविध प्रात्यक्षिके आणि कृतीशील उपक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी गणितीय संकल्पना समजून घेण्यासाठी तर्कशक्तीवर्धक खेळ आणि कोडी सोडवली. गणितीय क्रिया, परिमाणे, एकके, क्षेत्रफळ मोजमाप आणि वजने यांचा व्यवहारात कसा उपयोग होतो हे प्रात्यक्षिकाद्वारे दाखवण्यात आले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत गणितासंबंधित विविध उपक्रमांमध्ये आवडीने भाग घेतला. यामुळे त्यांचा गणिताविषयीचा आत्मविश्वास वाढला आणि विषय सोपा वाटू लागला.
कार्यक्रमाचा समारोप विद्यार्थ्यांच्या अभिप्रायांनी व प्रात्यक्षिकांतील निष्कर्षांनी करण्यात आला. मुख्याध्यापक शरद ढाले यांनी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व अशा कार्यक्रमांनी विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकास होईल असे मत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे समनव्यक गणित शिक्षक श्री दीपक बारतीने हे होते
